बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध
ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन
बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन

बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ४ : वडगाव पोलिस ठाणे व गंगामाता वाहन शोध संस्थेने पोलिस ठाण्याच्या परिसरात पडलेल्या ९८ वाहनांच्या मालकाचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. पोलिस ठाण्यात वाहनांचा क्रमांक, वाहनाचा प्रकार, चासिस क्रमांक, इंजिन क्रमांक, वाहन मालकांचे नाव व पत्ता अशी यादी लावली असून, त्यानुसार वाहन मालकांनी १५ दिवसांत ओळख पटवून आपले वाहन घेऊन जावे असे आवाहन वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.
पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये शेकडो वाहने जप्त केली जातात. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्यामुळे ही वाहने ठाण्याच्या आवारात अनेक वर्षे मालकांच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून राहतात. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुढाकार घेऊन, बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेत वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार वडगाव पोलिसांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यासाठी परंदवडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनांची पाहणी केली. उदावंत व वडगाव पोलिसांनी बेवारस वाहनांचे चासिस व इंजिन क्रमांक यावरून वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावला. एकूण ९८ वाहनांपैकी ४९ बेवारस वाहने आहेत. मूळ मालकांनी पत्र मिळताच आठ दिवसांत आत आपले वाहन घेऊन जावे. अन्यथा ४९ वाहनांचा न्यायालयीन आदेशानुसार लिलाव करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक भोसले यांनी दिली. मूळ मालकांचा शोध लावण्याच्या मोहिमेत पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्यासह हवालदार मनोज कदम, श्रीशैल कंटोळी, संदीप वंडाळे, सिद्धांत वाघमारे, बाबासाहेब बागडे, संजय काळे यांनी सहभाग घेतला.
फोटो ः 04296

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02670 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..