शेती मालाची विनापरवाना खरेदी-विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेती मालाची विनापरवाना खरेदी-विक्री 
करणाऱ्यांवर होणार कारवाई
शेती मालाची विनापरवाना खरेदी-विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

शेती मालाची विनापरवाना खरेदी-विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १० : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी न घेता शेती मालाची विनापरवाना खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे मुख्य प्रशासक नंदकुमार धनवे व उपमुख्य प्रशासक गजानन शिंदे यांनी दिली.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नियमन केलेल्या भात, तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, मका, हरभरा, शेंगदाणा, गवत, कडबा, गूळ, भुईमूग, मिरची, अंडी, कोंबड्या, शेळी-मेंढ्या, जनावरे आदी शेतीमालाची व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची खरेदी-विक्री करावयाची झाल्यास बाजार समितीचा परवाना (लायसन्स) घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केलेल्या व्यवहारावर होणारी बाजार-फी समितीकडे भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधितांनी बाजार समितीचा अधिकृत परवाना घेऊन बाजार शुल्काचा भरणा करावा, असे आवाहन समितीचे मुख्य प्रशासक धनवे, उपमुख्य प्रशासक शिंदे व प्रशासकीय मंडळाने केले आहे. अन्यथा संबंधितांची यादी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून महसुली अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र शेतीच्या उत्पन्नाची खरेदी विक्री नियमन अधिनियम १९६३ व त्याखालील तयार झालेले नियम १९६७ व बाजार समितीच्या पोट नियमाप्रमाणे नियमन शेतीमालाची अथवा शेतीमालापासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची खरेदी-विक्री करणाऱ्या संबंधितास कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (नियमन) अधिनियम कलम (६) (१) नुसार लायसन्स (अनुज्ञप्ती) घेणे, नूतनीकरण करणे व व्यवहारानुसार समितीच्या उपविधी १२ (२) प्रमाणे एक टक्का बाजार शुल्क, देखरेख फी तसेच परवाना फीचा भरणा बाजार समितीकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे. विनापरवाना सदरचा व्यवहार केल्याचे आढळल्यास संबंधितांवर अधिनियम १९६३ चे कलम ४६ नुसार कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. बाजार समितीकडे परवाना व बाजार फी चा भरणा न केल्याने समितीच्या उत्पन्नावर व शासनाच्या महसुलावर परिणाम होत आहे. व्यवहार करणाऱ्या संबंधितांनी बाजार समितीचा अधिकृत परवाना घेऊन खरेदी-विक्री केलेल्या शेतीमालाच्या व्यवहारावर होणारी फी भरून समितीस सहकार्य करावे, जेणेकरून समितीच्या बाजार आवारात शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधांयुक्त मार्केट यार्डची उभारणी लवकरात लवकर करणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी समितीचे सचिव एम. ए. घारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक मंडळाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02689 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..