जिल्ह्यात लम्पी आजाराचे एक लाख लसीकरण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात लम्पी आजाराचे 
एक लाख लसीकरण पूर्ण
जिल्ह्यात लम्पी आजाराचे एक लाख लसीकरण पूर्ण

जिल्ह्यात लम्पी आजाराचे एक लाख लसीकरण पूर्ण

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १२ : जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी या आजारावरील दोन लाख २५ हजार लसी उपलब्ध झाल्या असून, त्यापैकी एक लाख लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.
जिल्ह्यातील लम्पी या जनावरांना होणाऱ्या आजारासंदर्भात वायकर यांनी पशुसंवर्धन आयुक्त मुकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला. जिथे जिथे या आजाराचा संसर्ग झालेला आहे. त्याच्या पाच किलोमीटर व्यास परिसरातील जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना वायकर यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला केली. जेणेकरून ज्यांना संसर्ग झाला अशी जनावरे व ज्यांना होऊ शकतो अशा जनावरांचे लसीकरण होईल. आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वीच वेळीच खबरदारी म्हणून लसीकरण केले तर होणारा संसर्ग टाळता येईल. या बाबत त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन डॉ. विधाटे यांनी दिले. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त तीन जनावरांचा मृत्यू झालेला असून, बाकी ठिकाणी परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती डॉ. विधाटे यांनी दिली. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण होईपर्यंत आपल्या जनावरांची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वायकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02695 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..