मावळमध्ये भाजपचे टाळा ठोक आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळमध्ये भाजपचे 
टाळा ठोक आंदोलन
मावळमध्ये भाजपचे टाळा ठोक आंदोलन

मावळमध्ये भाजपचे टाळा ठोक आंदोलन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १६ : मावळ तालुक्यातील सहकार विभागाचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी टाळा ठोक आंदोलन करण्यात आले.
भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, गुलाबराव म्हाळसकर, निवृत्ती शेटे, नारायण भालेराव, प्रशांत ढोरे, शांताराम कदम, बाळासाहेब जाधव, अनंता कुडे, अभिमन्यू शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, निवृत्ती शेटे, समीर जाधव, राजेंद्र खांडभोर, कुलदीप बोडके, सुधाकर ढोरे, सुनील चव्हाण, किरण राक्षे, मच्छिंद्र केदारी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. रवींद्र भेगडे, सूर्यकांत वाघमारे, ज्ञानेश्वर दळवी आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी विठ्ठल सूर्यवंशी यांनी केलेल्या बेकायदेशीर निर्णयाचा व अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला. सूर्यवंशी यांनी तालुक्यातील गृहनिर्माण संस्था, कृषी विकास संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर निर्णय घेतले असून या सर्व निर्णयांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी व त्यांची तालुक्यातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, उपनिबंधक बाळासाहेब तावरे यांनी आंदोलकांशी चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूर्यवंशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यांची लवकरात लवकर सखोल उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई केली जाईल व उद्यापासून ते या कार्यालयात दिसणार नाहीत, असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे घोषित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02702 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..