मावळ तालुक्यात स्वच्छता मोहीम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळ तालुक्यात स्वच्छता मोहीम सुरू
मावळ तालुक्यात स्वच्छता मोहीम सुरू

मावळ तालुक्यात स्वच्छता मोहीम सुरू

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १९ ः मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मावळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी दिली.
या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना गटविकास अधिकारी भागवत यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत गावांच्या दृश्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची मावळ तालुक्यातही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची बैठक घेऊन, मोहिमेबाबत माहिती देण्यात आली आहे. मोहिमेची सुरवात गाव स्वच्छतेने करण्यात यावी. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ, गाव परिसरात, सार्वजनिक ठिकाणी कोठेही कचरा, अडगळ व साचलेले पाणी दिसणार नाही. प्लॅस्टिक कचरा अथवा प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. गाव स्वच्छता करण्यासाठी श्रमदान आयोजित करावे. गावात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो, अशा ठिकाणांची यादी करून साफसफाई करावी. श्रमदानात स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी, सेवा भावी संस्था, महिला बचत गट, युवा संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सहभागी करून विविध कामे वाटून द्यावीत. गावात स्वच्छतेच्या अंगाने प्रभात फेरी काढावी. स्वच्छता मोहिमेत जमा झालेल्या प्लॅस्टिक कचरा एका ठिकाणी जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे. गावातील कचरा कुंड्यामधील कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी. कचरा स्रोतांच्या ठिकाणी ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती करावी. कचरा संकलन व वर्गीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करावे. पंधरावा वित्त आयोग अथवा स्वनिधीतून आवश्यक कचरा कुंड्यांची खरेदी करावी. कचरा वाहून नेण्यासाठी वाहनांची खरेदी करावी. एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी. पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून, त्याच्या सभोवताली वृक्षारोपण करावे. २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिनानिमित्त ग्रामसभांचे आयोजन करावे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून, सर्व उपक्रमांच्या दैंनदिन नोंदी केंद्र सरकारच्या संकेत स्थळावर करणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती भागवत यांनी दिली.

वडगाव मावळ ः मावळ पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत स्वच्छतेची शपथ घेताना ग्रामसेवक व इतर कर्मचारी.
फोटो ः 04401

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02714 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..