नवरात्रोत्सवानिमित्त वडगावात विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सवानिमित्त
वडगावात विविध कार्यक्रम
नवरात्रोत्सवानिमित्त वडगावात विविध कार्यक्रम

नवरात्रोत्सवानिमित्त वडगावात विविध कार्यक्रम

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २३ : येथील जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती माजी उपसरपंच विशाल वहिले व अध्यक्ष ओमकार पिंजण यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात (घटस्थापना ते विजयादशमी) दररोज सायंकाळी सात ते अकरा दांडिया, बुधवारी (ता.२८) डान्स स्पर्धा, एक ऑक्टोबर व दोन ऑक्टोबरला रास गरबा दांडिया फॅन्सी ड्रेस स्पर्धा (छोटा व मोठा गट), चार ऑक्टोबरला महिलांसाठी ८० गृहोपयोगी भेट वस्तूंचा लकी ड्रॉ, कोजागरी पौर्णिमेनिमित्त शहरातील महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा हा स्पर्धात्मक कार्यक्रम होईल. प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02728 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..