Mon, Feb 6, 2023

वेदांत स्थलांतरण
दिशाभुलीच्या निषेधार्थ मोर्चा
वेदांत स्थलांतरण दिशाभुलीच्या निषेधार्थ मोर्चा
Published on : 25 September 2022, 12:02 pm
वडगाव मावळ, ता. २५ : वेदांत फोक्सकॉन कंपनी स्थलांतरित विषयाबाबत महाविकास आघाडी महाराष्ट्रातील व मावळच्या जनतेची दिशाभूल करीत असल्याच्या निषेधार्थ मावळ तालुका भाजपच्या वतीने सोमवारी (ता. २६) निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिली. सोमवारी सकाळी दहा वाजता पोटोबा मंदिरापासून मोर्चाला सुरुवात होणार असून पंचायत समिती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी सहभागी होणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.