संत तुकाराम कारखान्याची वाकडमध्ये उद्या सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत तुकाराम कारखान्याची
वाकडमध्ये उद्या सभा
संत तुकाराम कारखान्याची वाकडमध्ये उद्या सभा

संत तुकाराम कारखान्याची वाकडमध्ये उद्या सभा

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २७ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २९) वाकड येथे होणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिली. वाकड (डांगे चौक) येथील श्री संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. सभेत विविध विषयांवर चर्चा व विचार विनिमय केला जाणार असल्याची माहिती भेगडे यांनी दिली. सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष भेगडे व कार्यकारी संचालक एस.जी. पठारे यांनी केले आहे.