सुरक्षित मालमत्तेसाठी कायद्याचे ज्ञान बाळगा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षित मालमत्तेसाठी 
कायद्याचे ज्ञान बाळगा 
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आवाहन
सुरक्षित मालमत्तेसाठी कायद्याचे ज्ञान बाळगा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आवाहन

सुरक्षित मालमत्तेसाठी कायद्याचे ज्ञान बाळगा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आवाहन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ३ ः आपली मालमत्ता सुरक्षित व वादातीत ठेवायची असेल तर कायद्याचे ज्ञान आत्मसात करा. गुंतागुंतीचे व विचित्र व्यवहार करू नका, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.
येथील मावळ विचार मंचाने नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सतीश राऊत होते. प्रमुख पाहुणे उद्योजक रामदास जैद, मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, अध्यक्ष सुदेश गिरमे, वैशाली ढोरे, राणी म्हाळसकर आदी उपस्थित होते.
‘प्रॉपर्टी आणि माणूस’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, देशभरात सध्या प्रॉपर्टीविषयक सव्वा चार कोटी खटले चालू आहेत. मी स्वतः पंचवीस हजार केसेस हाताळल्या आहेत. त्यात एक विरुद्ध एक अशी पक्षकारांची संख्या कमी आहे. तशी जरी धरल्यास सुमारे आठ कोटी पक्षकार आहेत. वर्षानुवर्षे हे खटले चालू आहेत. ४६ गुंठ्याचा वाद असलेला एक खटला तर ८६ वर्षे चालला. विलंबामुळे पक्षकारांच्या पैशाचा व वेळेचा मोठा अपव्यय होत आहे. विकृत आणि विचित्र व्यवहार केल्यामुळे खटल्यांची संख्या वाढत आहे. दिलेला शब्द न पाळणे, कायद्याबद्दल अज्ञान, चुकीच्या कोर्टात दावा दाखल करणे, दलालांचा सुळसुळाट, सामाजिक इर्षा, धार्मिक व जातीय द्वेष व प्रशासकीय दोष ही खटले वाढण्याची कारणे आहेत. आपली प्रॉपर्टी वादातीत ठेवायची असेल तर गुंतागुंतीचा व्यवहार करू नका. कायद्याचे सखोल ज्ञान आत्मसात करा, असा सल्ला त्यांनी दिला. गायकवाड यांनी यावेळी काही पक्षकार व त्यांच्यातील वादाची गमतीदार उदाहरणे सांगितली. एकच प्रॉपर्टी तीन- तीन जणांना विकल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. अडचणीच्या व भानगडीच्या जमिनी विकण्याचा काही जणांचा धंदाच असल्याची टीका त्यांनी केली. येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू हर्षदा गरुड, स्नेहल म्हाळसकर, रुग्णसेवक मिलिंद नवाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अरुण वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद पिंगळे यांनी आभार मानले.


फोटो- 04517