ढोरेवाडा येथे घर फोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढोरेवाडा येथे घर फोडीत
दोन लाखांचा ऐवज लंपास
ढोरेवाडा येथे घर फोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

ढोरेवाडा येथे घर फोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १३ : ढोरेवाडा येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. अन्य दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शैलेंद्र रामचंद्र ढोरे (वय ५१, रा. ढोरेवाडा) यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार ढोरेवाडा येथे शैलेंद्र ढोरे हे तळमजल्यावर राहत असून त्यांचे भाऊ नगरसेवक राहुल हे वरच्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी साडेसहा ते मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान, शैलेंद्र ढोरे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन अंगठ्या, कानातील झुमके, कानातील टॉप, रिंगा, राजकोट टॉप असा सुमारे १ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. उपनिरीक्षक शीला खोत पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आंबेडकर कॉलनी व मयुरेश्वर कॉलनी येथेही चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.