कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन
कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन

कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.१७ : भारतीय जनता पक्षाच्या (जैन प्रकोष्ठ) यांच्या वडगाव शहर विभागाच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात १४० जणांची तपासणी करण्यात आली.
माजी नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्‍घाटन भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे व तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष अनंता कुडे, शिवाजीराव टाकवे, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सोपानराव ढोरे, अ‍ॅड. तुकाराम काटे, नारायण ढोरे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, गटनेते दिनेश ढोरे, किरण भिलारे, नितीन कुडे, दिलीप म्हाळसकर, नीलेश म्हाळसकर, धनश्री भोंडवे, महेंद्र म्हाळसकर आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक मोबाईल डिटेक्शन बसमध्ये विविध प्रकारच्या कॅन्सरच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. डॉ.लता राघव, डॉ.मनोज पाटील, लॅब टेक्निशियन जगजीत सिंह, शीतल काकरे आदींनी सहभाग घेतला. कल्पेश भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले. युवा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी आभार मानले.