वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भोंडवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भोंडवे
वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भोंडवे

वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भोंडवे

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.२१: वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे शंकर नंदकुमार भोंडवे यांची निवड झाली.
भाजपचे यापूर्वीचे स्वीकृत नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी शंकर भोंडवे यांचा एकमेव अर्ज जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडे दाखल झाला होता. छाननीत तो वैध ठरला. शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वीकृत नगरसेवकपदी भोंडवे यांची निवड झाल्याची घोषणा केली. उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रवीण चव्हाण , सुनीता भिलारे, दीपाली मोरे आदी उपस्थित होते. निवडीनंतर भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कुडे, सुधाकर ढोरे, भाऊ ढोरे, रवींद्र काकडे, भूषण मुथा, प्रसाद पिंगळे, शामराव ढोरे, महिलाध्यक्षा धनश्री भोंडवे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, किरण भिलारे आदींच्या उपस्थितीत भोंडवे यांचा सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली. भास्करराव म्हाळसकर म्हणाले की, ‘‘या पदावर पक्षातील निष्ठावंत, क्रियाशील व पक्षासाठी योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत असून उर्वरित काळातही हेच धोरण कायम राहील. कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीच्या आगमी निवडणुकीच्या तयारीला लागावे.’’