ज्येष्ठ नागरिक समितीकडून वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक समितीकडून
वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा
ज्येष्ठ नागरिक समितीकडून वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

ज्येष्ठ नागरिक समितीकडून वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २४ : दिवाळीचे औचित्य साधून येथील ज्येष्ठ नागरिक समितीने आपल्या सदस्याचा वाढदिवस अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रमात अन्नदान करून साजरा केला. ज्येष्ठ नागरिक समितीचे सदस्य राजेंद्र राऊत यांचा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक समितीने वृद्धाश्रमातील वृध्दाशी संवाद साधत साजरा केला. वृद्धाश्रमाच्या प्रमुख विश्वस्त प्रीती वैद्य यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. समितीचे तालुका समन्वयक नितीन भांबळ, व्याख्याते विवेक गुरव, प्राचार्य अल्पना मोहंता, अतुल राऊत, भाऊसाहेब वहिले, बारकू ढोरे, अविनाश कुडे, बाळकृष्ण ढोरे, चंद्रकांत राऊत, मनोहर बागेवाडी, लक्ष्मण ढोरे आदी उपस्थित होते.