आनंदाचा शिधावाटप देण्याची वडगावात मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाचा शिधावाटप देण्याची वडगावात मागणी
आनंदाचा शिधावाटप देण्याची वडगावात मागणी

आनंदाचा शिधावाटप देण्याची वडगावात मागणी

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २८ : दिवाळीनिमित्त राज्य सरकारच्या वतीने रेशनिंग दुकानातून नागरिकांना आनंदाचा शिधावाटप झाले असून काही शिधापत्रिका ऑनलाइन नसल्याने संबंधित नागरिक लाभापासून वंचित राहत आहेत. अशा शिधा पत्रिका तत्काळ ऑनलाइन करून घ्याव्यात, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. खासदार बारणे यांनी या बाबत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना पत्र दिले आहे. मावळ तालुक्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात आला. त्यात काही जणांकडे रेशन कार्ड असूनही ते ऑनलाइन नसल्याने काही नागरिकांना त्याचा लाभ घेता आला नाही. अन्न धान्य योजनेच्या लाभापासून ही या शिधापत्रिकाधारकांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे जे शिधाधारक ऑनलाइन नाहीत त्यांना तत्काळ ऑनलाइन करून घ्यावे व त्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी बारणे यांनी केली आहे.