वडगावात डेंगीचा प्रादुर्भाव रोखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात डेंगीचा प्रादुर्भाव रोखा
वडगावात डेंगीचा प्रादुर्भाव रोखा

वडगावात डेंगीचा प्रादुर्भाव रोखा

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.२ : वडगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस त्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी वडगाव शहर भाजपने केली आहे.
पक्षाच्या वतीने याबाबत नगरपंचायतीला निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष अनंता कुडे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, अतुल म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वडगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, रुग्णालयात नागरिकांची गर्दी वाढली आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करावी. जनतेमध्ये जनजागृती करावी अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. डेंग्यूला आळा घालण्यासंदर्भात सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

VDM22B04641