त्रिपुरा संगीत महोत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुरा संगीत महोत्सवाचे आयोजन
त्रिपुरा संगीत महोत्सवाचे आयोजन

त्रिपुरा संगीत महोत्सवाचे आयोजन

sakal_logo
By

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त
आज संगीत महोत्सव
वडगाव मावळ, ता. ७ : येथील स्वरांजली संगीत परिवाराच्यावतीने श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या सहकार्याने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (ता. ८) त्रिपुरा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. रवींद्र आचार्य यांनी दिली. येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी सायंकाळी सातला हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात स्थानिक गायक भावगीते, भक्तिगीते, अभंग सादर करणार आहेत. श्रोत्यांनी या संगीतमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी केले आहे.