वडगाव मावळमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव मावळमध्ये 
तरुणाचा मृतदेह आढळला
वडगाव मावळमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

वडगाव मावळमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ११ : वडगाव मावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर गुरुवारी रात्री एक अनोळखी तरुण मृतावस्थेत आढळून आला. मृत तरुणाचे अंदाजे (वय ३०) असून उंची पाच फूट पाच इंच आहे. रंगाने गोरा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, डोक्याची केस काळे वाढलेले, दाढी-मिशी काळी वाढलेली असे मृताचे वर्णन आहे. अंगामध्ये पिवळ्या रंगाचा फूल शर्ट व मिलिटरी निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, पायात पिवळ्या रंगाची चप्पल असा पेहराव आहे. तरुणाचा जुनाट अंगरोगाने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली. मृताविषयी माहिती असल्यास तळेगाव रेल्वे पोलिस हवालदार वसंत कुटे (९९२३३८५८९८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.