वडगावात कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात कुत्र्यांचा बंदोबस्त 
करण्याची मागणी
वडगावात कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

वडगावात कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.१९ : वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे जिल्हा पदाधिकारी सुशीलकुमार भिडे यांनी केली आहे. भिडे यांनी याबाबत नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी विजय सरनाईक यांना पत्र दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वडगाव नगरपंचायत हद्दीमधील सर्व रस्त्यांवर व गल्ल्यांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. ती लोकांच्या मागे पडतात. त्यांनी चावा घेतल्याने अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांची सुरक्षितता लक्षात घेऊन नगरपंचायतीने मोकाट सुटलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी भिडे यांनी केली आहे. नागरिकांनीही या कुत्र्यांपासून सावधगिरी बाळगावी. लहान मुलांना एकटे सोडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.