खरेदी खतामध्ये खोटे घोषणापत्र; वडगावात दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदी खतामध्ये खोटे घोषणापत्र;
वडगावात दोघांवर गुन्हा
खरेदी खतामध्ये खोटे घोषणापत्र; वडगावात दोघांवर गुन्हा

खरेदी खतामध्ये खोटे घोषणापत्र; वडगावात दोघांवर गुन्हा

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २२ : खरेदी खतामध्ये रद्द केलेले कुलमुखत्यारपत्र दस्त जोडून तसेच खोटे व चुकीचे घोषणापत्र देऊन नोंदणी अधिनियमाचा भंग करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
चेतन खेरजमल आगीचा (तक्षशिला को ऑप हाउसिंग सोसायटी, म्हाडा, मोरवाडी, पिंपरी) व संतकुमार हेमचंद कृपलानी (रा. शेरे पंजाब सोसायटी, अंधेरी पूर्व, मुंबई) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वडगाव मावळचे तत्कालीन दुय्यम निबंधक बळवंत किसन कणसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मार्च २००८ रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला. आरोपींनी संगनमताने इंदोरी येथील एका जमिनीचे मूळ मालक मालती धोंडीबा भालेकर, हेमंत धोंडिबा भालेकर, शिशिर धोंडिबा भालेकर, संगीता सुरेश राऊत, संजय धोंडिबा भालेकर यांच्याकडून मिळकतीचे घेतलेले कुलमुखत्यारपत्र झालेले असताना मिळकतीच्या खरेदी खतामध्ये ते जोडले. त्याच्या आधारे मान्यता देऊन तसेच खोटे व चुकीचे घोषणापत्र देऊन नोंदणी अधिनियमाचा भंग केला व सरकारची फसवणूक केली. गुन्ह्याचा पुढील तपास ए. एम. तावरे करीत आहेत.