सांगिसे सेवा विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय गरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगिसे सेवा विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय गरुड
सांगिसे सेवा विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय गरुड

सांगिसे सेवा विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय गरुड

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २४ : सांगिसे विविध कार्यकारी सेवा विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय गरुड यांची निवड झाली. संस्थेचे यापूर्वीचे अध्यक्ष भाऊसाहेब बांगर यांनी संस्थेच्या संचालक मंडळाने ठरविल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. या पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी विनोद कोतकर यांनी विशेष सभा घेतली. त्यात अध्यक्षपदी संजय गरुड यांची निवड झाली. या वेळी सहायक निबंधक घुले, कृषी उत्पन्न समितीचे माजी उपसभापती विष्णू गायखे, सचिव मंगेश घारे, भाऊसाहेब बांगर, बाळासाहेब गायकवाड, अंकुश टाकळकर, मच्छींद्र गरुड आदी उपस्थित होते.