नऊ ग्रामपंचायतींसाठी २२५ उमेदवारांचे अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऊ ग्रामपंचायतींसाठी २२५ उमेदवारांचे अर्ज
नऊ ग्रामपंचायतींसाठी २२५ उमेदवारांचे अर्ज

नऊ ग्रामपंचायतींसाठी २२५ उमेदवारांचे अर्ज

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २ : मावळातील नऊ ग्रामपंचायतींच्या ८३ जागांसाठी २१९ जणांचे २२५ तर सरपंच पदासाठी ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. दरम्यान, सोमवारी ( ता.५ ) अर्जांची छाननी होणार आहे.
इंदोरी, सावळा, देवले, भोयरे, शिरगाव, वरसोली, कुणे नामा, निगडे व गोडुंब्रे या नऊ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या १८ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. महत्वाच्या इंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पाच तर सहा प्रभागातील १७ जागांसाठी ३८, निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पाच तर तीन प्रभागातील नऊ जागांसाठी ३७, भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार तर तीन प्रभागातील सात जागांसाठी १७, सावळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पाच तर तीन प्रभागातील सात जागांसाठी ११, शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ११ तर तीन प्रभागातील नऊ जागांसाठी ४२, गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पाच तर तीन प्रभागातील नऊ जागांसाठी १४, वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तीन तर तीन प्रभागातील नऊ जागांसाठी २१, देवले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सहा तर तीन प्रभागातील सात जागांसाठी १८, कुणे नामा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सात तर तीन प्रभागातील नऊ जागांसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. सोमवारी (ता. ५) अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर आहे. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.