दादांकडून विकासात्मक राजकारण दिगंबर भेगडे यांच्याविषयीच्या आठवणींना मान्यवरांकडून उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादांकडून विकासात्मक राजकारण  
दिगंबर भेगडे यांच्याविषयीच्या आठवणींना मान्यवरांकडून उजाळा
दादांकडून विकासात्मक राजकारण दिगंबर भेगडे यांच्याविषयीच्या आठवणींना मान्यवरांकडून उजाळा

दादांकडून विकासात्मक राजकारण दिगंबर भेगडे यांच्याविषयीच्या आठवणींना मान्यवरांकडून उजाळा

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ११ ः माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा देत विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
भेगडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री मदन बाफना, राम शिंदे, बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, शंकरराव शेलार, गणेश ढोरे, बाळासाहेब नेवाळे, सोपानराव म्हाळसकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश बवरे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, मनसेचे तालुका प्रमुख रूपेश म्हाळसकर, विठ्ठलराव शिंदे, ज्ञानेश्वर दळवी, निवृत्ती शेटे, राजाराम शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, साहेबराव काशीद, रवींद्र दाभाडे, तुषार महाराज दळवी, मंगल महाराज जगताप, सुरेखा जाधव, रूपाली दाभाडे, सायली बोत्रे, सुमित्रा जाधव, गुलाबराव वाघोले, लक्ष्मण भालेराव, राजू खांडभोर, आशिष ठोंबरे, यशवंत मोहोळ, तानाजी काळभोर, विश्वनाथ शेलार, विकास कंद आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून भेगडे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. अजात शत्रू व पक्षाचे जोडे बाजूला ठेवून विकासात्मक राजकारण करण्याचा दादांचा गुण अंगीकारणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. खासदार बारणे म्हणाले, ‘‘दादांनी अनेक क्षेत्रातील माणसे जोडून नात्याचे जाळे विणले. कोणावरही वैयक्तिक टीका - टिपण्णी न करता विकासात्मक राजकारण केले.’’
राम शिंदे म्हणाले, ‘‘दादांचे जीवन पाण्यासारखे निष्कलंक व निर्मळ राहिले. पंढरीचा वारकरी खऱ्या अर्थाने मावळचा मानकरी शोभला. त्यांच्या विचाराचे अनुकरण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.’’ मदन बाफना, माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर म्हणाले, ‘‘आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलो तरी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही. कायम एकमेकांचा आदर केला.’’ आमदार शेळके म्हणाले की, दादा म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व होते. पक्षभेद विसरून तालुक्याचा समतोल व सलोखा राखण्याचे काम त्यांनी केले. मतभेद झाले तरी मनभेद होता कामा नये, हे त्यांचे तत्त्व व आदर्श घेऊन काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी भेगडे कुटुंबियांच्यावतीने ऋणनिर्देश व्यक्त केले. शांताराम कदम व अनंता कुडे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटोः 04825.