जयंत पाटील कारवाई विरोधी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत पाटील कारवाई विरोधी आंदोलन
जयंत पाटील कारवाई विरोधी आंदोलन

जयंत पाटील कारवाई विरोधी आंदोलन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २३: नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या सरकारचा धिक्कार असो. दडपशाही करणाऱ्या सरकारचा व विधानसभा अध्यक्षांचा निषेध असो. आमदार जयंत पाटील साहेब, आमदार सुनील शेळके, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. अशा घोषणा कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी दिल्या. कारवाई त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली. येथील पंचायत समितीच्या चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर, आशिष ढोरे, अंकुश आंबेकर, रणजित हिंगे, समीर कदम, गणेश शिंदे, साजिद इनामदार, भारत अडीवळे, शिवनाथ पडवळ, शाम पवार, चेतन थोरवे, शुभम करवंदे, अक्षय जाधव, मंगेश जाधव आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.