Mon, June 5, 2023

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी कांबळे
शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कांबळे
Published on : 22 February 2023, 9:22 am
वडगाव मावळ, ता.२२ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नारायण कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सुरेखा थोपटे-औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. या सभेत अध्यक्षपदी कांबळे व उपाध्यक्षपदी थोपटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब औटी, शोभाताई वहिले, दिलीपकुमार वेदपाठक, संदीप औटी, गोरक्ष जांभूळकर, बाळासाहेब शिंगाडे, सुमीत नळे, राजू लोंढे, सुहास धस, प्रमोद गायकवाड, दत्तात्रेय भालेराव, बाबासाहेब काळे उपस्थितीत होते.