मावळ बाजार समितीचे परवाना नूतनीकरणाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळ बाजार समितीचे 
परवाना नूतनीकरणाचे आवाहन
मावळ बाजार समितीचे परवाना नूतनीकरणाचे आवाहन

मावळ बाजार समितीचे परवाना नूतनीकरणाचे आवाहन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २३ : बाजार समितीच्या परवान्याचे नूतनीकरण मुदतीत करून घ्यावे, असे आवाहन मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुका कार्यक्षेत्रातील समितीने नियमन केलेल्या भात, तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, मका, हरभरा, शेंगदाणा, गवत, कडबा, गूळ, भुईमूग, मिरची (लाल), अंडी, कोंबड्या, शेळ्या- मेंढ्या, जनावरे आदी शेतीमालाची अगर त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची खरेदी-विक्री करावयाची झाल्यास बाजार समितीचा परवाना (लायसन्स) घेणे आवश्यक आहे. तसेच केलेल्या व्यवहाराची होणारी बाजार फी समितीकडे भरणे व सदरचा परवाना मुदतीत नूतनीकरण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधितांनी बाजार समितीचा अधिकृत परवाना घेऊन बाजार शुल्काचा व लायसन्स फीचा भरणा करावा, अन्यथा संबंधितांची यादी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून महसुली अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बाजार समितीकडे लायसन्स व बाजार फीचा भरणा न केल्याने समितीच्या उत्पन्नावर व शासनाच्या महसुलावर परिणाम होत आहे. त्यामुळे व्यवहार करणाऱ्या संबंधितांनी बाजार समितीचा अधिकृत परवाना घेऊन व परवाना असलेल्यांनी मुदतीत नूतनीकरण करून खरेदी- विक्री केलेल्या शेतीमालाच्या व्यवहारावर होणारी फी भरून समितीस सहकार्य करावे. जेणेकरून समितीच्या बाजार आवारात शेतकऱ्यांसाठी विविध प्रकाराच्या सोयी सुविधायुक्त मार्केट यार्डची उभारणी करणे लवकर शक्य होईल. अधिक माहितीसाठी समितीचे सचिव एम. ए. घारे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.