वडगावमध्ये शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

वडगावमध्ये शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

वडगाव मावळ, ता. २७ : शिवजयंतीनिमित्त येथील राजा शिवछत्रपती जयंती उत्सव समितीने सात ते दहा मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर व अध्यक्ष नगरसेवक दिनेश ढोरे यांनी दिली.
येथील ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित शिवजयंती महोत्सवात सात मार्चला सकाळी नऊ वाजता नगराध्यक्ष मयूर ढोरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होईल. नऊ ते अकरा या वेळात जय बजरंग तालीम मंडळाच्या संयोजनातून पारंपरिक दगडी गोट्या उचलण्याची स्पर्धा होईल. स्पर्धेचे उद्‍घाटन तहसीलदार मधुसूदन बर्गे व पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी सात वाजता गौरीताई सांगळे यांचे कीर्तन होईल. यावेळी देवस्थानला क वर्ग दर्जा प्राप्त झाल्याबद्दल सर्व विश्वस्तांचा तुषार महाराज दळवी व नंदकुमार भसे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल. आठ रोजी सकाळी वडगाव सोसायटी संचालकांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन, सायंकाळी चार वाजता महिलांसाठी वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर हा स्पर्धात्मक कार्यक्रम होईल. स्पर्धेचे उद्‍घाटन प्रदेश महिला भाजपच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, सारिका भेगडे, सुरेखा जाधव, सायली बोत्रे यांच्या हस्ते होईल. विजेत्या महिलांना मानाची पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला अशी बक्षिसे दिली जातील. युवती अध्यक्षा राणी म्हाळसकर यांच्या वतीने सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. नऊ रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा होईल. छत्रपती श्री २०२३ विजेत्याला २१ हजार रुपये व करंडक देण्यात येईल. राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू केतन कारंडे स्पर्धेचे आकर्षण असेल. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा यावेळी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांची विशेष उपस्थिती असेल. दहा रोजी सकाळी सात वाजता दिनेश ढोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन, साडेसात वाजता सहजयोग ध्यान केंद्राच्या सहभागाने शिवजन्मोत्सव साजरा होईल. विविध किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतींचे लायन्स क्लबच्या वतीने स्वागत करण्यात येईल. सकाळी नऊ वाजता लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व दुपारी दोन वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, सायंकाळी पाच वाजता गणेश मंडळांच्या सहभागातून शिवप्रतिमेची मिरवणूक व त्यानंतर पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळा होईल. कृष्णाबाई काशीद, संतोष महाराज घनवट, मधुसूदन बर्गे, मुकुंद ठाकर, दत्तात्रेय कुडे, अश्विनी गुंड यांना खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे असतील. रात्री नऊ वाजता महाराष्ट्राची लोक परंपरा हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष दिनेश ढोरे, कार्याध्यक्ष रवींद्र म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख सोमनाथ ढोरे, श्रीधर चव्हाण, शरद मोरे, दीपक कुडे, प्रशांत चव्हाण, सागर भिलारे, कल्पेश भोंडवे, अतुल म्हाळसकर, दीपक भालेराव, हरीश दानवे, ओंकार शिंदे, अमोल ठोंबरे, गणेश हिंगे आदींनी महोत्सवाचे संयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com