वडगावात गॅसगळतीमुळे भडका होऊन चौघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात गॅसगळतीमुळे
भडका होऊन चौघे जखमी
वडगावात गॅसगळतीमुळे भडका होऊन चौघे जखमी

वडगावात गॅसगळतीमुळे भडका होऊन चौघे जखमी

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १ : येथील हॉटेल ओरिटेल जवळील ढोरे चाळीत सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून गॅसगळती झाल्याने गॅसचा भडका होऊन चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. बबन बिरादार, संदीप राऊत, मनोहर पाटील, भरत पडवळ अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघे जण भाड्याने घेतलेल्या खोलीत राहात आहेत. सोमवारी रात्री सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून गॅसगळती होऊन भडका उडाला. त्यात चौघे जण होरपळून गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या रहिवाशांनी शेजारील आरएमसी प्लॅन्टमधून पाणी टँकर आणून आग विझवली व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विशाल जांभळे पुढील तपास करत आहेत.