जिल्हा बॅंक सेवक पतसंस्थेत चंद्रकांत ढोरे यांचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंक सेवक पतसंस्थेत
चंद्रकांत ढोरे यांचा विजय
जिल्हा बॅंक सेवक पतसंस्थेत चंद्रकांत ढोरे यांचा विजय

जिल्हा बॅंक सेवक पतसंस्थेत चंद्रकांत ढोरे यांचा विजय

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १० ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मावळ तालुका गटातून वडगाव मावळ येथील चंद्रकांत ढोरे यांचा ८२ मतांनी विजय झाला.
पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनेल व स्वामी समर्थ सहकार पॅनेलमध्ये लढत झाली. मावळ गटातून सहकार परिवर्तनचे उमेदवार म्हणून चंद्रकांत ढोरे तर स्वामी समर्थ पॅनेलचे उमेदवार म्हणून गुलाबराव खांदवे यांच्यात सरळ लढत झाली. ढोरे यांना ४३२ तर खांदवे यांना ३५० मते मिळाली. त्यामुळे ढोरे हे ८२ मतांनी विजयी झाले. ढोरे हे जिल्हा बँकेच्या वडगाव मावळ शाखेत सेवेत असून, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. निवडीनंतर आमदार सुनील शेळके, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, भास्करराव म्हाळसकर, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, अनंता कुडे आदींच्या हस्ते ढोरे यांचा सत्कार करण्यात आला.

वडगाव मावळ ः जिल्हा बँक सेवकांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार चंद्रकांत ढोरे यांचा सत्कार करताना आमदार सुनील शेळके, सोपानराव म्हाळसकर आदी.
फोटोः 05249.