मावळात अवकाळी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात अवकाळी पाऊस
मावळात अवकाळी पाऊस

मावळात अवकाळी पाऊस

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १६ : वडगाव परिसरात गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले व सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे येथील आठवडे बाजारातील विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी सावलीसाठी उभारलेला निवारा जोरदार वाऱ्याने उडून गेला. प्लॅस्टिक कागद फाटून नुकसान झाले.