सामुदायिक मंगल परिणय सोहळा 
अध्यक्षपदी डॉ. समीर जाधव

सामुदायिक मंगल परिणय सोहळा अध्यक्षपदी डॉ. समीर जाधव

वडगाव मावळ, ता. १७ : जनहित चॅरिटेबल ट्रस्टने सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२३ चे आयोजन केले असून, या सोहळ्यासाठी नियोजन समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी डॉ. समीर जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
जनहित चॕरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार, सल्लागार दादासाहेब यादव, सचिव सचिन कांबळे, प्रवीण भवार, संजय गायकवाड, अनिता गायकवाड, प्रभाकर वाघमारे, राजेंद्र भालेराव, सुभाष यादव, गौतम सोनवणे आदींच्या उपस्थितीत सामुदायिक मंगल परिणय सोहळा नियोजन समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. डॉ. समीर जाधव यांची एकमताने अध्यक्षपदी तर भाऊ साबळे यांची महासचिवपदी निवड करण्यात आली. इतर कार्यकारणी पुढील प्रमाणे- विभागीय उपाध्यक्ष- आंदर मावळ-राहुल जाधव, पवन मावळ- विजय गायकवाड, नाणे मावळ- विजय साबळे, शहरी विभागीय उपाध्यक्ष- कामशेत- विपुल जाधव, वडगाव- नितीन आल्हाट, देहुरोड- संकेत जगताप, कार्याध्यक्ष- सुनील सोनवणे, कोषाध्यक्ष- प्रविण सरोदे, सहकोषाध्यक्ष- किरण ओव्हाळ, संपर्क प्रमुख- रुपेश गायकवाड, सहसंपर्क प्रमुख- कुणाल घोडके, प्रसिद्धी प्रमुख- अमोल शिंदे, कायदेशीर सल्लागार- ॲड. योगेश गायकवाड, ॲड. अमोल देसाई, संघटक- सिद्धार्थ भालेराव, तुकाराम डोळस, भावेश थोरात, दीपक शिंदे, महेश थोरात, पवन भवार, मारुती सोनवणे, विकास शिंदे, जयश्री सदवर्ते, वृषाली कदम, गणेश गायकवाड, दिनेश खरात. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. दादासाहेब यादव यांनी सामुदायिक मंगल परिणय सोहळ्याची ध्येय व उद्दिष्टे सांगितली.

छायाचित्र : डॉ. समीर जाधव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com