सातेमध्ये उद्या शिवस्मारकाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातेमध्ये उद्या
शिवस्मारकाचे लोकार्पण
सातेमध्ये उद्या शिवस्मारकाचे लोकार्पण

सातेमध्ये उद्या शिवस्मारकाचे लोकार्पण

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २० : साते येथे उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (ता.२२) होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजता हा समारंभ होईल. खासदार श्रीरंग बारणे, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, आमदार सचिन आहिर, गोरक्षक शिवशंकर स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद कृषी समितीचे माजी सभापती बाबूराव वायकर, शिवराज ग्रुपचे अध्यक्ष अतुल वायकर यांच्या हस्ते शिवस्मारकाचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात वडगाव येथील महादजी शिंदे उद्यान ते साते अशी दुचाकी रॅली, शाहिरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक व आरती, भजन आदींचा समावेश आहे. शिवस्मारक समिती, शिवभक्त व ग्रामपंचायतीने संयोजन केले आहे.