Wed, May 31, 2023

उपाध्यक्षपदी
चंद्रकांत ढोरे
उपाध्यक्षपदी चंद्रकांत ढोरे
Published on : 20 March 2023, 12:04 pm
वडगाव मावळ, ता. २० : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी येथील चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ढोरे हे मावळ गटातून विजयी झाले होते. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नुकतीच निवड झाली. अध्यक्षपदी नीलेश थोरात यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.