आंबेडकर जयंतीनिमित्त
वडगावात समूहचर्चा

आंबेडकर जयंतीनिमित्त वडगावात समूहचर्चा

वडगाव मावळ, ता. १९ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वडगाव शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने समरसता स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला आघाडीच्या सूचनेनुसार वडगाव शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. महिला आघाडीच्या शहराध्यक्षा धनश्री भोंडवे यांच्या निवासस्थानी समरसता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी मदतनीस आणि कायदेतज्ज्ञ महिलांनी सहभाग घेतला. यावेळी केंद्र शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. शकुंतला वाडेकर यांनी महिलांविषयक बदललेल्या व नवीन कायद्यांची माहिती दिली. सामुहिक चर्चेनंतर उपस्थित महिलांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. मनीषा ढोरे, मीना ढोरे, मंगल जाधव, सोनाली पांडागळे, सुजाता चांदेकर, भाग्यश्री टपाले, उज्वला ठोंबरे, शकुंतला नागे व नीलम दिवाडकर आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. धनश्री भोंडवे व वैशाली ढोरे यांनी समूहचर्चेचे संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com