
वडगावात स्वच्छतेची शपथ
वडगाव मावळ, ता. २ : वडगावमध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापनदिन व कामगार दिन उत्साहात साजरा झाला. येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य समारंभ झाला. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली. तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, यशवंत मोहोळ, भाऊसाहेब ढोरे, संपत वाळुंज, उद्धव होळकर आदी उपस्थित होते. आमदार शेळके यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मावळ पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी ध्वजवंदन केले. सहायक गटविकास अधिकारी प्रताप पाटील आदींसह अधिकारी वर्ग उपस्थित होता. वडगाव नगरपंचायतीच्या प्रांगणात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आदींसह सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. शहरातील स्वच्छता राखण्या संदर्भात सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
वडगाव मावळ : महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करताना आमदार सुनील शेळके सोबत तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे आदी.