वडगावात विकास कामांसाठी 
एक कोटी दहा लाखांचा निधी

वडगावात विकास कामांसाठी एक कोटी दहा लाखांचा निधी

वडगाव मावळ, ता. ९ : शहरातील विविध विकास कामांसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी दिली.
वडगाव शहर भाजपने शहरातील विकास कामांसाठी निधीची मागणी खासदार बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार खासदार फंडातून एक कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले. मंजूर विकासकामांमध्ये नगरपंचायत हद्दीतील रमेश पाटील यांचे घर ते यशवंत लोणकर यांचे घर व विनोद गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण १० लाख रुपये, मुख्य रस्ता ते आनंद भोसले व येवले यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण १० लाख रुपये, नारायण ढोरे ते बबन ढोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण १० लाख रुपये, प्रभाग नऊ मधील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण १० लाख रुपये, प्रभाग ११ मधील हायवे ते चिमण ढोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण १० लाख रुपये, प्रभाग १२ मधील हायवे ते सॅफरॉन स्काय सोसायटीपर्यंत काँक्रिटीकरण १० लाख, प्रभाग १३ मधील हनुमंत ढोरे घर ते नवनाथ भोसले घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण १० लाख, प्रभाग १४ मधील युवराज सूर्यवंशी घर ते सार्वजनिक शौचालयापर्यंत काँक्रिटीकरण १० लाख, प्रभाग १५ मधील ठाकरवस्ती अंतर्गत भूमिगत गटारे आणि काँक्रिट रस्ते १० लाख, प्रभाग १६ मधील वडगाव-तळेगाव साखळी रस्ता ते प्रवीण ढोरे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण १० लाख, प्रभाग १७ मधील शामशिल्प सोसायटी समोरील रस्ता डांबरीकरण १० लाख अशा ११ विकास कामांसाठी एक कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कुडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com