तलाठी कार्यालयाचे वडगावात भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलाठी कार्यालयाचे
वडगावात भूमिपूजन
तलाठी कार्यालयाचे वडगावात भूमिपूजन

तलाठी कार्यालयाचे वडगावात भूमिपूजन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ९ : येथे सुमारे ४० लाख ७६ हजार रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील चावडी चौकातील जुन्या कार्यालयाची दुरवस्था झाल्याने तसेच नागरिकांची गैरसोय होत असल्याने येथे नवीन दुमजली इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीचे भूमिपूजन सोमवारी आमदार शेळके यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, चंद्रजित वाघमारे, विशाल वहिले, प्रवीण ढोरे, मंगेश खैरे, अविनाश चव्हाण, अतुल राऊत, संतोष खैरे, किसनराव वहिले, गंगाराम ढोरे, नितीन भांबळ, सुरेश कुडे, बाळासाहेब भालेकर, संतोष निघोजकर, मजहर सय्यद आदी उपस्थित होते. शेळके म्हणाले, ‘‘मावळातील ४२ तलाठी कार्यालये व सात मंडलाधिकारी कार्यालये बांधकामांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर करून घेतला होता. प्रत्येक तलाठी कार्यालय हे अत्याधुनिक व साधारणपणे नऊशे स्क्वेअर फूट आकाराचे व एकसारखे दिसणारे असेल. त्यातील सुमारे तीस कार्यालयांची कामे सुरू झाली आहेत. त्यात प्रामुख्याने वडगावसह तळेगाव, इंदोरी, नवलाख उंब्रे, वराळे, चांदखेड, कान्हे, कामशेत, कार्ला आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे उरकण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत.’’ नगराध्यक्ष ढोरे म्हणाले, ‘‘आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला आहे. मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय सुसज्ज होणार असून नागरिकांची गैरसोय दूर होईल व तत्पर सुविधा उपलब्ध होतील.’’