केशवनगर-कातवी रस्ता 
विकसित करण्याची मागणी

केशवनगर-कातवी रस्ता विकसित करण्याची मागणी

वडगाव मावळ, ता. ९ : येथील केशवनगर मधुबन कातवी एमआयडीसीला जाणारा रस्ता नागरिकांच्या दळणवळण व विकासाच्या दृष्टीने विकसित करावा, अशी मागणी भाजपचे गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे यांनी नगरपंचायतीकडे केली आहे. ढोरे यांनी या संदर्भात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना निवेदन दिले आहे.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत असणारा वडगाव ते कातवी एमआयडीसी हा रस्ता पूर्वीपासून अस्तित्वात आहे. नागरिक आजही या रस्त्याचा वापर दळणवळणासाठी करत आहेत. केशवनगर भागात मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प झाल्याने येथील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या अनुषंगाने दळणवळणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या भागातील विद्यार्थी, कामगार व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन व केशवनगरच्या विकासाला चालना देण्यासाठी वडगाव ते कातवी एमआयडीसी हा रस्ता विकसित करावा अशी मागणी नगरसेवक ढोरे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com