साते गावात संभाजी जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साते गावात संभाजी जयंती उत्साहात
साते गावात संभाजी जयंती उत्साहात

साते गावात संभाजी जयंती उत्साहात

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १७ : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची जन्मभूमी असणाऱ्या ऐतिहासिक साते गावात छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी व उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुरंदर किल्ल्यावरून वरून अग्निज्योत आणण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात अग्निज्वालाचे आणि सहभागी सर्व युवक-युवतींचे स्वागत केले. गावातील प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावण्यात आला होता. संपूर्ण गावात ज्योत प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर ज्योत पूजन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडपासमोर भव्य रांगोळी काढण्यात आली होती. सायंकाळी मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशाच्या गजरात शंभु महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्व युवक आणि युवती मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. तसेच गावातील लहान मुले आणि युवतींनी लाठी-काठी प्रात्यक्षिक सादर केले. शिवशंभू यांच्या घोषणेने संपूर्ण गाव दुमदुमून गेले. नुकत्याच लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोर विविध मर्दानी कला सादर झाली. रायगडावरील होळीच्या माळावर होणाऱ्या मर्दानी खेळाचे स्वरूप यावेळी गावकऱ्यांनी अनुभवले. संध्याकाळी सरसेनापती हंबीरराव मोहिते हा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला.