गोपाळ नवजीवन केंद्राच्या
इमारतीचे बुधवारी भूमिपूजन

गोपाळ नवजीवन केंद्राच्या इमारतीचे बुधवारी भूमिपूजन

वडगाव मावळ, ता. २० : विश्व हिंदू परिषद पुरस्कृत येथील गोपाळ नवजीवन केंद्राच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (ता. २४) होणार असल्याची माहिती अध्यक्ष चंपालाल संघवी व कार्यवाह दिलीप देशपांडे यांनी दिली.
केशवनगर भागातील गोपाळ नवजीवन केंद्राच्या वतीने गेल्या ४३ वर्षांपासून मुलांसाठी वसतिगृह, बालवाडी, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, वाचनालय अशी विविध प्रकारची सेवाकार्य केली जात आहेत. या उपक्रमांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे नवीन इमारत बांधण्यात येत आहे. तिचे भूमिपूजन बुधवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता पुण्यातील मर्चंट चेंबर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भाटिया व उद्योजक व्ही. व्ही. मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, ॲड. दामोदर भंडारी, नितीन कारिया, पांडुरंग राऊत, बाबूजी नाटेकर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्राचे कोषाध्यक्ष दिलीप पळशीकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com