जांभूळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभूळ येथे विविध
विकास कामांचे भूमिपूजन
जांभूळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

जांभूळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २६ : जांभूळ येथे सुमारे ४० लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
जांभूळ ग्रामपंचायतीला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात जांभूळ दलितवस्ती पाण्याच्या टाकीसाठी १५ लाख रुपये, भूमिगत गटार योजनेसाठी १० लाख रुपये व अंतर्गत रस्त्यांसाठी १५ लाख रुपये निधीचा समावेश आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर, बबनराव ओव्हाळ, जांभूळचे सरपंच नागसेन ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे, सदस्या कल्पना काकरे, स्नेहल ओव्हाळ, तृप्ती जांभूळकर, रूपाली गायकवाड आदींच्या उपस्थितीत झाले. उपसरपंच एकनाथ गाडे यांनी सूत्रसंचालन केले. जांभूळ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नागेश ओव्हाळ यांनी आभार मानले.