गोपाळ नवजीवन केंद्राच्या
बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

गोपाळ नवजीवन केंद्राच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

वडगाव मावळ, ता. २७ ः विश्व हिंदू परिषद पुरस्कृत येथील गोपाळ नवजीवन केंद्राच्या नवीन बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
केशवनगर भागातील गोपाळ नवजीवन केंद्राच्यावतीने गेल्या ४३ वर्षांपासून मुलांसाठी वसतिगृह, बालवाडी, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, वाचनालय अशी विविध प्रकारची सेवाकार्य केली जात आहेत. या सर्व उपक्रमांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे सुमारे साडेचार लाख रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात येत आहे. तिचे भूमिपूजन पुण्यातील मर्चंट चेंबर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भाटिया व उद्योजक व्ही. व्ही. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्ष मयूर ढोरे, ॲड. दामोदर भंडारी, उद्योजक नितीन कारिया, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग राऊत, उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, प्रवीण ढोरे, संस्थेचे अध्यक्ष चंपालाल संघवी आदी उपस्थित होते. भाटिया व मुजुमदार यांनी संस्थेच्या सेवा कार्याचे कौतुक करून, आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. रेलफोर फाउंडेशनच्यावतीने पुष्पा नाथांनी यांच्या स्मरणार्थ नवीन इमारतीसाठी दहा लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर करण्यात आले. भार्गवराव सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यवाह दिलीप देशपांडे यांनी स्वागत केले. नंदकुमार गाडे व नामदेव आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष चंपालाल संघवी यांनी आभार मानले. संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप पळशीकर, श्रीकांत पतके, मनोज ढोरे, सुरेश बाफना, सागर कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, संतोष भेगडे, मंजूषा देशपांडे, सोमनाथ वैद्य आदींनी संयोजन केले.
------------
वडगाव मावळ ः गोपाल नवजीवन केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करताना मान्यवर.
फोटोः 05608

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com