वनवासी विद्यार्थी वसतिगृहातील 
प्रवेश प्रक्रिया सुरू

वनवासी विद्यार्थी वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

वडगाव मावळ, ता. ३ : केशवनगर भागातील गोपाळ नवजीवन केंद्राच्या कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्राचे कार्यवाह दिलीप देशपांडे व वसतिगृहाचे अधीक्षक सोमनाथ वैद्य यांनी दिली. प्रवेशात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना प्राधान्य दिले जाईल. प्रवेश अर्ज वसतिगृह कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९९२३०५६४१९ अथवा ७४९९०१७७५१ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्य यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com