महिला-बालस्नेही फिरत्या बस प्रकल्पाचे उद्घाटन
वडगाव मावळ, ता. १९ : होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन, गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व मावळ पंचायत समितीच्या वतीने सोलर पथदिवे लोकार्पण व महिला-बालस्नेही फिरत्या बस प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा झाला.
मावळ पंचायत समितीच्या प्रांगणात महिला-बालस्नेही फिरत्या बसचे पूजन गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह कंपनीचे मुख्य फायनान्स अधिकारी अजय चौधरी, फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शकील शेख, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. टाकवेचे सरपंच अविनाश असवले, उपसरपंच शेखर मालपोटे, विस्तार अधिकारी बाळासाहेब मतकर, बालविकास सहाय्यक ससाणे, व्यवस्थापक वैशाली पवार, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक सुभाष गायकवाड आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजय चौधरी यांनी सांगितले की, ‘‘गेस्टॅम्प कंपनीच्या सीएसआर निधीतून भविष्यातही असे विविध सामाजिक प्रकल्प राबविले जाणार आहेत. समाजासाठी भरीव योगदान देण्याचा आमचा संकल्प आहे.’’ सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात यांनी होप फॉर चिल्ड्रेन संस्थेच्या गेल्या चार वर्षांच्या कामाचे कौतुक केले.
प्रकल्पाचे समुदाय विकास समन्वयक ऋषिकेश डिंबळे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ही महिला-बालस्नेही फिरती बस आंदर मावळ परिसरातील ३३ गावांमध्ये आरोग्य, बाल संरक्षण, शिक्षण व ग्रामविकास या विषयांवर जनजागृती मोहिमा राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ऋषिकेश डिंबळे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश असवले यांनी आभार मानले.
आदिवासी बांधवांना दाखवली प्रकाशाची वाट
होप फॉर दी चिल्ड्रन फाउंडेशन व गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आंदर मावळच्या दुर्गम भागातील सुमारे २५ वाड्या-वस्त्यांमध्ये शंभर सोलर पथदिवे लावून आदिवासी बांधवांना प्रकाशाची वाट दाखवली आहे. आंदर मावळ भागातील अनेक गावांमध्ये वीजेचा अपुरा व अनियमित पुरवठा होतो. त्यामुळे डोंगराळ, दुर्गम भागांमध्ये रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेचा प्रश्न असतो. अनेकदा अंधारात सर्प दंशाच्या घटना घडतात. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रात्रीचा उजेड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नागरिकांची सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीनेही प्रकाशयोजना अत्यावश्यक असल्याची बाब या संस्थांच्या निदर्शनास आली व त्यांनी या भागामध्ये सोलर पथदिवे लावण्याचा प्रकल्प राबवला. भोयरे, कुणेवाडी, कुणे, अनसुटे, इंगळूण पारिठेवाडी, घोणशेत, वाऊंड, कचरेवाडी, खांडी, निळशी, कुसुर, निसाळवाडी, नागाथली, वहाणगाव, कातकरी वस्ती, बोरवली, धनगर पठार, कांब्रे, डाहुली, बेंदेवाडी, सावंतवाडी (महागाव) आदी २५ वाड्या-वस्त्यांमध्ये शंभर पथदिवे लावण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.