थेरगावात नागरिकांकडून ४७ किलो प्लॅस्टिक जमा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जनजागृती रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावात नागरिकांकडून 
४७ किलो प्लॅस्टिक जमा
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जनजागृती रॅली
थेरगावात नागरिकांकडून ४७ किलो प्लॅस्टिक जमा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जनजागृती रॅली

थेरगावात नागरिकांकडून ४७ किलो प्लॅस्टिक जमा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जनजागृती रॅली

sakal_logo
By

वाकड, ता. ३० : डांगे चौकातील थेरगाव फाटा या परिसरात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. ४७ किलो ग्रॅम प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. यावेळी महापालिका व विविध कंत्राटी कंपन्यांचे कर्मचारी, विद्यार्थी व रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीत स्वच्छतेबाबत, प्लास्टिक बंदी, कचरा विलागीकरण, स्वच्छाग्रही मिशन, स्वच्छ पिंपरी चिंचवड मिशन इत्यादी बाबत घोषणाबाजी करून संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागरिकांकडून हरित परिसराची शपथ घेण्यात आली.
रॅलीत आरोग्य निरीक्षक राजू बेद, सहायक आरोग्य अधिकारी वसंत सरोदे, मुख्य आरोग्य निरीक्षक प्रसाद जोशी, आरोग्य निरीक्षक सुरेश चनाल, कर्मचारी प्रशांत पवार, अभय दरोळे, सूर्यकांत चाबुकस्वार, सुरेश चव्हाण, तसेच महापालिकेसह डिवाईन, शुभम, एजी या संस्थेचे कर्मचारी, स्वामी समर्थ सेवा केंद्र व त्यातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, बचत गट सदस्य व स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.

फोटो ओळ
थेरगाव :
१) थेरगाव परिसर स्वच्छ आणि हरित ठेवण्याची शपथ घेताना नागरिक, विद्यार्थी, महापालिका अधिकारी.

२) परिसरात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत प्लॅस्टिक कचरा संकलित करताना कर्मचारी.
फोटो ः 01753, फोयटो ः 01754, 01755

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00662 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top