बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी समृद्धी म्हमाणेची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी 
समृद्धी म्हमाणेची निवड
बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी समृद्धी म्हमाणेची निवड

बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी समृद्धी म्हमाणेची निवड

sakal_logo
By

वाकड, ता. ३० : कोकट, उज्बेकिस्तान येथे होणाऱ्या बेल्ट रेसलिंग वर्ल्ड चैंपियनशिपमध्ये सोळा ते सतरा वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावच्या समृद्धी जयदेव म्हमाणे हिची भारतीय संघात ४८ किलो वजन गटात निवड झाली आहे.
समृद्धीने आतापर्यंत जिल्हा व राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत. ती आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाणे यांची कन्या असून, तिला शहरात दंगल गर्ल म्हणून ओळखले जाते. तिला बेल्ट रेसलिंग खेळाचे धडे घरातूनच मिळाले असून, ती सध्या पिंपरी चिंचवड ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन या संस्थेत सराव करीत आहे. या निवडीनंतर पिंपरी चिंचवड ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष उद्योजक अविनाश रानवडे यांनी तिचा सन्मान करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रेसलिंग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ -
थेरगाव : जागतिक बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर समृद्धी म्हमाणेचा सन्मान करताना अविनाश रानवडे व मान्यवर.
२) खेळाडू समृद्धी म्हमाणे
01757, 01758

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00663 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top