
राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबल्याने कारवाईला वेग
जोड
महापालिका बरखास्त झाल्याने नगरसेवकांचा होणारा विरोध आणि हस्तक्षेप मावळल्याने अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाईला वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाकड, हिंजवडी रस्ता, ताथवडे, पुनावळे येथील बीआरटी मार्ग आणि महामार्गालगत असलेल्या अनधिकृत बांधकामे आणि व्यावसायिक गाळे पाडण्यात आली. या कारवाईला आता प्रचंड वेग आला आहे. वाकड हिंजवडी बीआरटी मार्गालगत असणारे सुमारे ७५ आणि ताथवडे, पुनावळे भागातील शंभर दुकाने जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती उपअभियंता मनाली स्वामी यांनी दिली.
‘‘महापालिका अथवा पीएमआरडीए क्षेत्रात रस्ते किंवा अन्य कामांसाठी आरक्षित झालेल्या जमिनी स्थानिक शेतकऱ्यांनी महापालिका प्रशासनाला देऊ केल्या. मात्र, उर्वरित मालकी हक्काच्या जागेत जर मालकाने काही दुकाने अथवा तात्पुरते बांधकाम केल्यास महापालिकेला कारवाई करण्याची गरज नाही. अन्यथा तात्पुरते स्वरूपाची शिथिल नियमावली राबवावी.’’
- सागर भूमकर, स्थानिक रहिवासी
‘‘मुळात महापालिकेची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असताना सर्व समावेशक कायदा आणि नियम करणे हे महापालिका प्रशासनाचे काम आहे. तर नियमावली पाळणे व त्याची अंलबजावणी हे सर्व सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे. मात्र, आज जी कारवाई झाली ती चुकीची वाटते. त्यामुळे सर्व समावेशक आणि समान धोरण राबविताना काहीतरी सवलत आम्हा दुकानदारांना द्यावी.’’
- विनायक चौधरी, फर्निचर व्यावसायिक
Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00676 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..