
पहिल्या पावसातच ‘आयटी’चे प्रवेशद्वार तुंबले खड्डे व साचलेल्या पाण्यातून काढावी लागते वाट, तब्बल दोन तास कोंडी
वाकड, ता. ६ : पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात संबंधित संस्थांना आलेले अपयश, ठिक-ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, जागोजागी साचलेले पावसाचे पाणी आणि खड्डे यामुळे पहिल्या पावसातच आयटीनगरी
हिंजवडीच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यावर वाहनचालकांना तब्बल दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली.
बुधवारी (ता. ६) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पडलेल्या
खड्ड्यात पावसाचे पाणी साचून वाहतूक मंदावली. हिंजवडीकडे जाणाऱ्या बहुतके रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वरून धो-धो बरसणारा पाऊस, साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने ‘आयटीयन्स’ची पुरती दमछाक झाली. येथील ताथवडे गावठाणापासून हायवेकडे जाणाऱ्या अशोकनगर झोपडपट्टीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पसरले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
दिवसभरातील स्थिती
१) भूमकर चौक भुयारी मार्गात काही प्रमाणात पाणी साचले.
२) भुयारी मार्गाबाहेरील मोठया खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला
३) विनोदे वस्तीमार्गे लक्ष्मी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल शीतलसमोर सुमारे दोन फूट पाणी साचले.
३) पुनावळे अंडरपास मार्गात गुडघाभर पाणी
४) ताथवडे अंडरपास मार्गात पाणी
५) विनोदे कॉर्नर येथे खड्डा पडल्याने पाणी साचून वाहने सावकाश जात असल्याने वाहनांच्या रांगा
६) ताथवडे शनी मंदिर चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातच पावसाने खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी
७) काळखडक झोपडपट्टी कोपऱ्यावर खड्डे पडून पाणी साचले.
Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00730 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..