तेजस जाधव व प्रतिक्षा मनोहर ठरले यंग शेफ आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पाककला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेजस जाधव व प्रतिक्षा मनोहर ठरले यंग शेफ

आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पाककला स्पर्धा
तेजस जाधव व प्रतिक्षा मनोहर ठरले यंग शेफ आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पाककला स्पर्धा

तेजस जाधव व प्रतिक्षा मनोहर ठरले यंग शेफ आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पाककला स्पर्धा

sakal_logo
By

वाकड, ता. १० : चिखली येथील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात आयोजित यंग शेफ पाककला स्पर्धेत तेजस जाधव व प्रतिक्षा मनोहर यांनी साऊथ इंडियन चेट्टीनाड ही रेसिपी साकारत प्रथम क्रमांकाबरोबर यंग शेफ हा किताबही
पटकावला. दीपक कोलगे आणि अंजिक्य डांगे यांनी कोंकणी मोदक आणि मासे ही डिश बनवून द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गातील २८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येकी दोघांचे १४ ग्रुप करण्यात आले. या स्पर्धेसाठी खास हिंदुस्तान युनिलिवर फूड सोल्यूशन या कंपनीचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्यावतीने पुरविण्यात आलेल्या कच्च्या ५८ पदार्थांचा व स्वतःच्या सर्जनशीलतेचा वापर करून नावीन्यपूर्ण पाककृती विद्यार्थ्यांनी साकारल्या. तमिळनाडू, महाराष्ट्रीयन, केरळ, पाश्चिमात्य, चेट्टीनाड, कोंकणी, राजस्थानी आदी भारतीय तसेच फ्रेंच, इटालियन, जापनीज अमेरिकन या आंतरराष्ट्रीय डिशेस साकारून विद्यार्थ्यांनी मान्यवरांची मने जिंकली.
आयआयबीएम कॉलेजचे चेअरमन डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. संचालक राम रैना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हिंदुस्तान युनिलिव्हर फुड सोल्युशन कंपनीचे रिजनल शेफ (वेस्ट) आशिष दामले, रॉनी कुंदले, शिवम भट, आश्विन कुमार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शेफ पीटर गोम्स, अनुभव वाजपेयी, दीपक जैस्वाल, आंनद किशोरे, विकास औटी यांनी परिश्रम घेत संयोजन केले.

फोटो ओळ -
चिखली : विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना डॉ. धनंजय वर्णेकर, आशिष दामले, रॉनी कुंदले, शिवम भट, आश्विन कुमार व शिक्षकवृंद.

फोटो ः 01983, 01984

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00744 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..