अलार्ड पब्लिक स्कूलची गोगुलवार राज्यात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलार्ड पब्लिक स्कूलची 
गोगुलवार राज्यात प्रथम
अलार्ड पब्लिक स्कूलची गोगुलवार राज्यात प्रथम

अलार्ड पब्लिक स्कूलची गोगुलवार राज्यात प्रथम

sakal_logo
By

वाकड, ता. २७ : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आयटी पार्क मारुंजी येथील अलार्ड पब्लिक स्कूलने उत्तम यश प्राप्त केले आहे. बारावीतील श्रावणी गोगुलवार या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविण्याबरोबर अलार्ड या संस्थेचेही नाव मोठे केले आहे.
श्रावणीला ५०० पैकी ४९७ गुण मिळाले असून, एकूण ९९.४ टक्के गुण मिळवून ती राज्यात प्रथम आली आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, शारीरिक शिक्षण या तीन विषयात तिने पैकीच्यापैकी गुण मिळवले आहेत. या संस्थेचा बारावीचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला असून, श्रेया मेहता (९७), अथर्व सरदेसाई (९६.८), सैकत सरदार (९६.४), पियुष बाबर (९६.४) या विद्यार्थ्यांनीही उत्तम यश मिळविले आहे.
दहावीतील यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः
नेहल चौरे (९६.४), अभिजित प्रसाद (९५.४), आर्य भिसे (९३.६), सानवी मदन (८९.४)
काशवी श्रीवास्तव (८९), आदर्श प्रकाश (८५)
अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. एल. आर यादव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फोटोः 02085

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00779 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top