वेदांता सोसायटीत वृक्षारोपण उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेदांता सोसायटीत 
वृक्षारोपण उपक्रम
वेदांता सोसायटीत वृक्षारोपण उपक्रम

वेदांता सोसायटीत वृक्षारोपण उपक्रम

sakal_logo
By

वाकड, ता. २८ : कोरोना महामारीने ऑक्सिजनचे महत्त्व संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. मनुष्य आणि संबंध जीवसृष्टीसाठी नैसर्गिक वरदान असलेले ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येणाऱ्या पिढीवर येऊ नये व त्याचे महत्त्व सर्वांना कळावे म्हणून वाकड येथील वेदांता सोसायटीच्या रहिवाशांनी पावसाचा फायदा घेत श्रमदानातून सोसायटी आवारात वृक्षारोपण केले.
विविध प्रकारचे फळे, फुले, औषधी झाडे तसेच ऑक्सिजनसाठी उपयुक्त अशी पर्यावरणपूरक अनेक रोपे लावण्यात आली. या मोहिमेत लहान बालकांचाही समावेश लक्षणीय होता. असे उपक्रम सर्व सोसायटीच्या सभासदांनी राबविल्यास भविष्यात संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हिरवागार होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे सर्वांनी झाडे लावून, झाडे जगवण्याचे आवाहन सोसायटीचे चेअरमन सोमनाथ धोंडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00782 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..